संपादकीय

मुस्लीम आरक्षणासाठी मुंबईत ११ डिसेंबरला माेर्चा,

 

मुंबई | राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्दा तापत असताना आता मुस्लिप आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता दिसून येत आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मंडळाच्या जमीन घाेटाळ्यांतील दाेषींवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी ११ डिसेंबरला मुंबईत महामाेर्चा काढण्यात येत असल्याचे एआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात एमआयएम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात मुस्लीम समाजातील युवकांनी तिरंगा झेंडा लावून सहभागी व्हावे. पक्षीय जाेडे बाजूला ठेवून या माेर्चात यावे, असे आवाहनही खा. असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची सहायता वर्तवली जात आहे.

Back to top button