संपादकीय

पुन्हा या देशाच्या राज्यपालांनी ‘आपत्कालीन आणीबाणी’ची केली घोषित  

 

न्यूयॉर्कमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाने आपले डोके वर काढले असून कोरोना व्हायरसने पुन्हा हाहाकार घातला आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने राज्यपालांनी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे. वाढते संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणार रुग्णांचा वेग वाढत असल्याचा अहवाल देते राज्यपालांनी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे.

राज्यपालांच्या या आदेशाचे शीर्षक ‘न्यूयॉर्क राज्यात आपत्कालीनची घोषणा’ आहे. ‘मी कॅथी होचुल, न्यूयॉर्क राज्याची राज्यपाल. संविधान आणि न्यूयॉर्क राज्यच्या कायद्याद्वारे मला दिलेल्या अधिकाराच्या आधारावर कार्यकारी कायदा कलम २-बीच्या कलम २८नुसार मी १५ जानेवारी २०२२ पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी आपत्कालीन आणीबाणी घोषित करते. कारण मला न्यूयॉर्कमध्ये आपत्ती आल्यासारखे दिसत आहे. ज्यासाठी स्थानिक सरकार पुरेसा प्रतिसाद देऊ शकत नाही.’

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रार्दुभाव आहे. गेल्या २४ तासांत न्यूयॉर्कमध्ये ५ हजार ७८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत न्यूयॉर्क राज्यात २८ लाख कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी जवळपास ५८ हजार जणांचा मृत्यू झाला असून २३.२६ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४ लाखांहून जास्त रुग्ण सक्रीय आहेत.

दरम्यान मध्यंतरी न्यूयॉर्कची परिस्थिती सुधारली होती, परंतु आतापर्यंत अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. अशी परिस्थिती पाहून राज्यपाल कॅथी होचुल यांनी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे.

Back to top button