📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त महिलांसाठी ‘मोफत मुळव्याध तपासणी’ शिबीर

भोपळे हॉस्पिटलचा पुढाकार; ७ एप्रिल रोजी महिला तज्ज्ञांमार्फत होणार तपासणी

बीड | प्रतिनिधी
आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश जपत, जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बीडमधील नामांकित भोपळे हॉस्पिटल च्या वतीने महिलांसाठी विशेष मोफत मुळव्याध, भगंदर व फिशर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरात महिला रुग्णांची तपासणी महिला डॉक्टरांच्या टीममार्फतच केली जाणार आहे.


हे शिबीर मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जालना रोडवरील भोपळे हॉस्पिटल येथे संपन्न होईल. या उपक्रमाबद्दल माहिती देताना डॉ. शितल भोपळे म्हणाल्या की, अनेकदा महिला संकोचामुळे किंवा भीतीपोटी मुळव्याध, भगंदर यांसारख्या आजारांची लक्षणे लपवून ठेवतात. मात्र, वेळीच निदान न झाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. शौचाच्या वेळी रक्त पडणे, वेदना होणे किंवा गाठ येणे ही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. महिलांना हक्काचे आणि सुरक्षित व्यासपीठ मिळावे, याच उद्देशाने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना औषधोपचारात विशेष सवलत दिली जाणार आहे. ज्या महिलांना वरील आजारांची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी 9404439845 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट रुग्णालयात उपस्थित राहावे, असे आवाहन भोपळे हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button