बीड

शिवसेनेची उद्या महत्वपूर्ण आढावा बैठक

शिवसेनेची उद्या महत्वपूर्ण आढावा बैठक

बीड :(प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब , युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना मराठवाडा संपर्क नेते आमदार सुनील प्रभू , विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर साहेब , शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शना नुसार संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उद्या मंगळवार दि 15 रोजी रोजी जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.

        स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका, युती -आघाडी- सावतंत्र संदर्भात चर्चा, पक्ष संघटन, पक्ष विचार, पक्ष बांधनी, पक्षातील इतर पदाधिकारी यांच्या रिक्त जागी नव्या नियुक्त्या याविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे .

      तरी सर्व उपजिल्हाप्रमुख ,जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शहर प्रमुख, शाखाप्रमुख , युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, शिव सहकार सेना, वाहतूक सेना, शिक्षक सेना, व शिवसेनेच्या अंगीकृत सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी केले आहे. सदरील बैठक दि 15 मंगळवार रोजी दुपारी 1:00 वाजता बसस्थानका मागे असणाऱ्या जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न होणार आहे.

Back to top button