बीड

जानकीच्या आनंदाला दिव्यांग, वृद्धांच्या आशिर्वादाची किनार पोखरकर परिवाराची बांधिलकी ; दिव्यांग, वृध्दांना दिले व्हिलचेअर

जानकीच्या आनंदाला दिव्यांग, वृद्धांच्या आशिर्वादाची किनार

पोखरकर परिवाराची बांधिलकी ; दिव्यांग, वृध्दांना दिले व्हिलचेअर

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-येथील पोखरकर परिवाराकडून पुन्हा एकदा बांधिलकी जोपासत दिव्यांग, वृध्दांना दिले व्हिलचेअर देण्यात आले. जानकी राजेंद्र पोखरकर हिचे अभिष्टचिंतन करीत जानकीच्या आनंदाला लाभली दिव्यांग, वृद्धांच्या आशिर्वादाची किनार लाभली.

हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करताना विविध गोष्टींवर भरमसाठ खर्च केला जातो. मात्र, या गोष्टींपेक्षा सामाजिक जाणीव ठेवत, समाजासाठी काहीतरी चांगले करून वाढदिवस साजरा करणे अधिक अर्थपूर्ण ठरते. येथील राजेंद्र पोखरकर यांनी त्यांची कन्या जानकी हिच्या ४ थ्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दिनांक ११ जुलै रोजी वयोवृद्ध, दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. समाजामध्ये अशा विविध समाज घटकांना आधार देण्याचं काम टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर यांच्या संकल्पनेतून आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राजेंद्र पोखरकर यांनी आपली मुलगी जानकी हिचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या प्रेरक कृतीचे सर्वस्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी, गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर, राजेंद्र भैय्या, दिपक लामतुरे, बालाजी रूद्राक्ष, कोंडीराम पवार, आदित्य देशमुख, दीपक पवार, स्वप्नील सोनवणे, तिरूपती राठोड व संपूर्ण पोखरकर कुटूंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.

=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================

Back to top button