बीड

मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवरील अत्याचाराने पुणे जिल्हा हादरला

मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवरील अत्याचाराने पुणे जिल्हा हादरला
संस्था बंद करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन
पुने:-संत भगवानबाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पिडीत युवतीच्या तक्रारीनुसार, २ जून २०२५ रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या जनाबाई आंधळे ह्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून (MH 43 CC 7812) आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्या वेळी आरडा-ओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे नेण्यात आले. तेथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेला एका मोबाईल फोनद्वारे 112 वर संपर्क साधून मदत मागावी लागली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सुरुवातीला घाबरल्यामुळे पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती, परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर ७ जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी खालील पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे:
1. आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे
2. प्रविण प्रल्हाद आंधळे
3. गाडीचा चालक (अनोळखी)
4. सुनिता अभिमन्यु आंधळे
5. अभिमन्यु भगवान आंधळे
पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरण, जबरदस्ती, बलात्कार, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारखे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली असून संस्थेच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सदरील घटनेचा निषेध करून आळंदी पोलीस स्टेशनला संस्था बंद करण्यासाठी व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे यासाठी आज निवेदन देण्यात आले
Back to top button