बीड

ऐतिहासिक किल्ले धारूरचा भुईकोट किल्ला केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षा मुळे विकासापासून वंचित

ऐतिहासिक किल्ले धारूरचा भुईकोट किल्ला केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षा मुळे विकासापासून वंचित
शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
किल्ले धारूर चा ऐतिहासिक किल्ल्याचा समावेश का नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व आशिष शेलार यांना  समर्थ सेनेचा सवाल

किल्ले धारूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब मग किल्ले धारूर च्या ऐतिहासिक किल्ल्याचा समावेश समर्थ सेनेची मागणी असतानाही का केला नाही? किल्ले धारूरचा ऐतिहासिक किल्ला हा पुरातन आहे शिवाय किल्ले धारूर ची व्यापार पेठ सोन्या चांदीची प्रसिद्ध बाजारपेठ या सर्व मोठा इतिहास किल्ले धारूर शहराला आहे यामुळे आपण जातीने लक्ष घालून धारूर च्या ऐतिहासिक किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करावा अशी मागणी समर्थ सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदर्श पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी केली आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार यांनी केले. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश होता.

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.  परंतु यामध्ये ऐतिहासिक किल्ले धारूर च्या किल्ल्याचे नाव वगळण्यात आले याबद्दल ऐतिहासिक किल्ले धारूर शहरातील इतिहास प्रेमी नागरिकांतून शासनाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विशेष व खास बाब म्हणून ऐतिहासिक किल्ले धारूर च्या भुईकोट किल्ल्यास जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक  प्रयत्न करावेत   या भुईकोट किल्ल्यास युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी त समावेश करण्याबाबत परत एकदा शिफारस करावी व हा भुईकोट किल्ला विकसित करावा अशी मागणी समर्थ सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी केले आहे शिवा या संदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, यांनाही पत्र लिहून न्याय मागणार आहोत असेही महेश कुलकर्णी यांनी म्हटले आहे

Back to top button