बीड

च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीसाठी ” १० लक्ष रुपयांचा निधी सीईओ आदित्य जीवनेकडुन मंजूर ; जलसमाधी आंदोलनाचे यश :- डॉ.गणेश ढवळे

च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीजजोडणीसाठी ” १० लक्ष रुपयांचा निधी सीईओ आदित्य जीवनेकडुन मंजूर ; जलसमाधी आंदोलनाचे यश :- डॉ.गणेश ढवळे

बीड:- ( दि.२१) बीड तालुक्यातील सराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या आठ वर्षापासून पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून सुरुवातीपासून वीज जोडणी अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वीजजोडणी साठी निधी देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर  यांच्या नेतृत्वात दि.१४ आक्टोबर रोजी च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड आदित्य जीवने यांची प्रत्यक्ष भेट घेत निधीची मागणी केली होती.तेव्हा गांभीर्याने याचा विचार करून लवकरच निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याचीच दखल घेत अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड आदित्य जीवने यांनी च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत व कर्मचारी निवासस्थान यांच्या विद्युतीकरणा साठी विद्युत रोहित्र ( डी .पी.) बसविणे कामासाठी
जिल्हा वार्षिक योजना सन२०२४- २०२५ अंतर्गत  १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद अग्नि सुरक्षा यंत्रणा खरेदी , दुरूस्ती, विस्तारीकरण व देखभाल , प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र  दुरुस्ती व परीक्षण ,पीट बरीयल बांधकाम (लेखाशिर्ष -२२१०l ०९४-३१) अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतुदींच्या अंतर्गत करण्यात आली आले.त्यामुळे अखेर वीज जोडणी नंतर रूग्णांची हेळसांड थांबणार असुन बीडला उपचारासाठी लागणार आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही याबद्दल आंदोलनकर्ते व ग्रामस्थांनी सीईओ जिप  आदित्य जीवने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ऊल्हास गंडाळ यांचे आभार मानले आहेत.

वीजजोडणी अभावी अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत;  शस्त्रक्रिया, प्रसुती,आंतरविभाग आरोग्य सेवा बंद
—–
च-हाटा परीसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ५ कोटी रुपये खर्चून ८ वर्षांपूर्वी आरोग्य केंद्र आणि अधिकारी,कर्मचारी निवासस्थाने यासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली होती. मात्र यासाठी सुरूवातीपासूनच वीज जोडणी करण्यात आलीच नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी रहात नसल्याने रूग्णांना उपचारासाठी बीडला जावे लागते.वीज जोडणी अभावी प्रसुती, शस्त्रक्रिया,आंतररुग्ण विभाग या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा असल्याने रूग्णांची हेळसांड होत होती. त्यामुळे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या सह च-हाटा येथील शेख युनुस,सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार,बप्पासाहेब पवार, मनोज तांदळे, सुभाष बांगर, संपत नागरगोजे, सुर्यकांत नागरगोजे, हरिश्चंद्र जाधव,भगिरथ उबाळे आदी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनात भाग घेतला होता. आता वीजजोडणी साठी निधी उपलब्ध झाला असुन लवकरच रूग्णांच्या अडचणी दुर होतील.

Back to top button