बीड

श्री. शिवाजीराव पंडित परिवार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे – पृथ्वीराज पंडित

श्री. शिवाजीराव पंडित परिवार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे – पृथ्वीराज पंडित
अनिल गोरे यांचा सेवापुर्ती समारंभ संपन्न
गेवराई दि.२(प्रतिनिधी) शिवाजीराव पंडित परिवार आणि शिवछत्र परिवाराच्या जडणघडणीमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे, या सर्व कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शिवछत्र परिवार कायम खंबीरपणे उभा आहे. अडचणीच्या काळात कधीही आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहोत असे प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराज पंडित यांनी केले. गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक अनिल गोरे यांच्या सेवापुर्ती समारंभात ते बोलत होते.
जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक अनिल सोपानराव गोरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, यानिमित्ताने सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन दिनांक १ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी जि.प.सदस्य बाबुराव काकडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, जयभवानी सहकारी साखर कारखाना संचालक श्रीराम अरगडे, गटनेते बाबासाहेब चौधरी, बंटी सौंदरमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते अनिल गोरे व सौ.अर्चना गोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र घुंबार्डे, बाळासाहेब चव्हाण, उमेश लगड, अमृत डावकर, कालिदास नवले, भाऊसाहेब नाटकर‌ यांनी आपल्या मनोगतात अनिल गोरे यांच्या कार्यकर्तूत्वावर प्रकाश टाकला.
यावेळी गटनेते फारुकभाई, दिपक आतकरे, शांतीलाल पिसाळ, ॲड. स्वप्निल येवले, ॲड. भगवानराव घुंम्बार्डे, मनोहर गिरी, जालिंदर राऊत, सदाशिव तौर, कृष्णा केरुळकर, प्रा. गोगुले, प्रा.डॉ. न.पु. काळे, सौ. ज्योती काळे, राजेंद्र खाडप, प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे, प्राचार्य डॉ. सोंडगे, मुख्याध्यापक अशोक तौर, सय्यद युनूस, अरुण हाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सि.बी. तौर यांनी केले. सुत्रसंचलन रणजित बडे यांनी केले तर प्राचार्य व्हि.पी. राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनिल गोरे यांचे आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button