बीड

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शिबिरात महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड – ज्येष्ठ भाजप नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका राजश्री पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांच्या पुढाकारातून तपनेश्वर भागात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आरोग्यसेवेचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, डॉ. संजय भोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ,वकिल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत, नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, पवन राळेभात, सामाजिक कार्यकर्ते सुंदर(काका)देशमुख,डॉ. अशोक बांगर, संजय परदेशी, ताहेर खान, सुरज पवार,आनंद ढवळे, राजेंद्र लोहार, रमेश जाधव, अनिकेत जाधव, योगेश औचरे, उमेश माळवदकर, गणेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात डॉ. भरत दारकुंडे, डॉ. अजय क्षिरसागर, डॉ. अमित पाळवदे व डॉ. पौर्णिमा अमित पाळवदे यांनी तज्ञ वैद्यकीय सेवा पुरवली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Back to top button