संपादकीय

विधान परिषदेची पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, पटोले यांची फडणवीसांकडे मागणी

 

मुंबई: काँग्रेस प्रेदश अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव तर भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या भेटीनंतर वेगवेगळ्या विषयावर पटोले यांनी भाष्य करत शरद पवार यांना टोला लगावला.

राज्यात विधान परिषदेची पोट निवडणूक आहे. राजीव सातव यांच्या पत्नीला तिकीट दिली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी फडणवीस यांना भेटलो. निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. यावेळी पटोले यांनी स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. तसेच चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी राज्यातील एसटी आंदोलनावर नाना पटोले यांनी यावेळी भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. मात्र, तरीही पुन्हा एसटी कर्मचारी मैदानात उतरले आहेत. भाजपची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. केंद्रात खासगीकरण झाले आहे त्याचे काय, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत आहे. तसेच आमची देखील एसटी कमरचाऱ्यांना सरकारी सेवेत घावे. अशी भूमिका आहे.

 

Back to top button