📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भाऊबीज निमित्ताने संजय भोसले यांच्याकडून‌ महिला सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप

भाऊबीज निमित्ताने संजय भोसले यांच्याकडून‌ महिला सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप

जामखेड प्रतिनिधी : भाऊबीज या सणानिमित्त जामखेड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम जामखेड ग्रामपंचायत चे माजी सरपंच माननीय संजय (काका) भोसले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

संजय भोसले हे सरपंच पदावर असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी नेहमीच आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत. त्याच भावनेतून ते दरवर्षी भाऊबीजच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना फराळ देण्याची परंपरा जपतात. यंदाही या उपक्रमाद्वारे महिला कर्मचाऱ्यांना सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. फराळ वाटप संजय (काका) भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संजय भोसले यांच्या सौभाग्यवती सुनिता संजय भोसले, रंजना बाळासाहेब भोसले, अनिता अजय भोसले, लक्ष्मी पंडित भोसले, आशा नवनाथ भोसले, कविता राजू भोसले, सविता डुचे, अंकिता डुचे, सुलाबाई गाडेकर, हिराबाई क्षिरसागर, अनिता क्षिरसागर, मनीषा शिंदे, लक्ष्मी ढवळे, हिराबाई गायकवाड, शेंबडे मावशी आदींची उपस्थिती होती.

Back to top button