बीड

नवीन मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी भविष्यात मोठे अधिकारी घडतील – शशिकांत सुतार

नवीन मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी भविष्यात मोठे अधिकारी घडतील – शशिकांत सुतार

नविन मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी – दि.१४नविन मराठी प्राथमिक शाळेचा गुणवत्तेचा आलेख मोठा असून येथील मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद मोठी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.यामुळे येथील विद्यार्थी भविष्यात मोठे अधिकारी घडतील असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग चे उप अभियंता शशिकांत सुतार यांनी केले

शहरातील लोकमान्य तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळा येथे दि.१४ मार्च २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता संस्थेचे सचिव राजेंद्र देशपांडे,कोषाध्यक्ष उमेश देशमुख,संचालक डॉ.प्रकाश खैरनार,
संचालक बंडोपंत पवार,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम चिंचकर,शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाताई राळेभात,भाजप नेते संजय काशिद, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार आदी शाळेचे सर्व शिक्षक,पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी यावेळी हिंदी, मराठी, लोकगीते,नाटके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या हस्ते नवीन मराठी प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक ,शिक्षिका यामध्ये अश्विनी बबन वाघ, सुवर्णा सोमीनाथ हार्दे, शंकर मारुती भांगरे,वृषाली भागवत जायभाय यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बांगर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका मिनाताई राळेभात यांनी मानले.

Back to top button