श्रमिकांच्या परिश्रमामुळेच आपली समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था उभी – ॲड.डॉ.अरुण आबा जाधव

श्रमिकांच्या परिश्रमामुळेच आपली समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था उभी – ॲड.डॉ.अरुण आबा जाधव
जामखेड प्रतिनिधी:- दि.१ मे २०२६ रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त श्रमिक कामगारांचे शाल गुलाब गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे .
यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की १ मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो श्रमिकांच्या कठोर परिश्रमामुळेच आपली समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था उभी आहे.कोणतेही छोटे-मोठे काम असो श्रमिक वर्गाशिवाय कोणतीही प्रगती शक्य नाही.कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात १ मे १९८६ मध्ये अमेरिकेच्या शिकागो शहरातून झाली त्यावेळी मजुरांनी आठ तास कामाचा हक्क मिळण्यासाठी आंदोलन केले होते.आपण ज्या इमारतीत राहतो ती इमारत तयार करण्यामागे कामगारांची मेहनत आहे आपण जे कपडे घालतो अन्न खातो वाहन चालवतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी कामगारांचे हात कारणीभूत असतात १ मे साजरा करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे कामगाराचे हक्क त्यांचे सन्मान आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष वेधणे अजूनही काही ठिकाणी कामगारांना त्यांच्या परिश्रमाचा तुलनेत योग्य मोबदला मिळत नाही त्यांना न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे असे जाधव म्हणाले.
यावेळी अधिक्षक वैजिनाथ केसकर, शिक्षक संतोष चव्हाण, तुकाराम शिंदे, सागर शिंदे,अश्रुबा गंगावणे, गौतमी प्रियंका शिंदे आदी उपस्थित होते.



