बीड
बदामराव पंडित पाठोपाठ बाळराजे पवार पण भाजपच्या वाटेवर चर्चेला उदान

बदामराव पंडित पाठोपाठ बाळराजे पवार पण भाजपच्या वाटेवर चर्चेला उदान
दोघे एकाच पक्षात आले तर एकत्र निवडणुका लढवतील का?
एकत्रित निवडणुका लढले तर राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
गेवराई (अंकुश आतकरे) गेवराई येथील राजकारण दिवसान दिवस तापत चालले असून बदामराव पंडित भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळ जवळ निश्चित असतानाच आता बाळराजे पवार ही भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला तर, येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत बदामराव पंडित व बाळराजे पवार एकत्र भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवणार का? अन तसे झाले तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही.
गेवराई नगर परिषदवर भाजपची मा.आ. लक्ष्मणराव पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता होती परंतु लक्ष्मणराव पवार यांनी भाजपचे आदेश धुडकावून लावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व तिथेच पक्षाने त्यांना राम राम ढोकला त्यानंतर भाजपच्या नेत्यांशी मा. मंत्री बदामराव पंडित यांची चांगली जवळकी झाली व त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा जवळजवळ निश्चित झाला असून, आता बाळराजे पवार यांच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत आहे. लवकरच तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बदामराव पंडित व बाळराजे पवार दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. असे जर घडले तर बदामराव पंडित व बाळराजे पवार एकत्र येऊन भाजपच्या चिन्हावर येणारी नगरपरिषद लढवणार का? दोघेही एकत्र येऊन लढले तर राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते परंतु विधानसभेला आ. विजयसिंह पंडित यांना गेवराई शहरातून चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळाले व आजही गेवराईतील अनेक कार्यकर्ते त्यांच्या कार्यपद्धतीवर तसेच मा.आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने त्यांची ही गेवराई शहरावर मजबूत पकड निर्माण झाली असून, येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.



