बीड
सिरसमार्ग येथील आंदोलनात काँग्रेस सक्षमपणे सोबत – राहुल सोनवणे

सिरसमार्ग येथील आंदोलनात काँग्रेस सक्षमपणे सोबत – राहुल सोनवणे
(१८ दिवसापासून आंदोलन सुरू मात्र प्रशासनाने घेतली नाही दखल)
गेवराई (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे गेल्या १८ दिवसापासून जायकवाडी धरणाचे पाणी सिंदफणा नदीमध्ये सोडण्यासाठीची योजना मंजूर करण्यासाठी उपोषणास बसलेल्या दिनेश गुळवे, देविदास चव्हाण, पप्पु रडे व त्यांचे सहकारी यांचे उपोषण सोडवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ व खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून सरकारकडून योजना मंजुरीसाठी ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित मंत्र्यांना भेटून सदरील योजना मंजुरीसाठी प्रयत्न करण्यासाठी अश्वस्त करून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली.
जायकवाडी चे पाणी सिंदफणा नदी मध्ये सोडावे या प्रमुख मागणीसह सीरसमार्ग येथे शेतकरी तब्बल १८ दिवसांपासून आंदोलनास बसलेले आहेत मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील दखल घेतली नाही हे दुर्देव आहे. परंतु मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने व पक्षाच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देतो व आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खा. रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढू असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, ज्येष्ठ नेते प्रविण शेप, काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे, प्रताप मोरे आदी उपस्थित होते.



