बीड

“बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकरी संस्कृतीचा उत्सव” — राजेंद्र मस्के

“बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकरी संस्कृतीचा उत्सव” — राजेंद्र मस्के

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त

लिंबागणेश येथे दिमाखदार ‘धर्मवीर केशरी’ बैलगाडी शर्यत संपन्न!

प्रथम विजेत्यास राजेंद्र मस्के यांच्याकडून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस

बीड प्रतिनिधी :
बैलगाडी शर्यत ही गावकुसातील सामाजिक ऐक्य, जिद्द आणि कृषी परंपरेचे दर्शन घडवणारी लोकपरंपरा असून, ग्रामीण संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. शेतकऱ्याने कष्टाने आणि प्रेमाने वाढवलेले बैल मैदानात धावताना केवळ वेगाचे प्रदर्शन करत नाहीत, तर कष्ट, निष्ठा आणि मातीतल्या नात्याचे अविस्मरणीय दर्शन घडवतात. ग्रामीण जीवनातील उत्साह आणि शेतकरी संस्कृतीचा खरा उत्सव म्हणजे बैलगाडी शर्यत होय, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिंबागणेश येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अनावश्यक खर्चाला फाटा देत, येथील तरुणांनी पशुपालक आणि शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करून महापुरुषांच्या जयंतीला विधायक दिशा देण्याचे कौतुकास्पद कार्य केले, असेही मस्के यांनी नमूद केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील बैलगाडी शर्यत रसिकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता. ग्रामीण वातावरणात या स्पर्धेमुळे वेगळीच ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

चौकट :

बैलगाडी शर्यतीतील प्रथम विजेत्या स्पर्धकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आयोजकांकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी अमर आबदार,अँड गणेश वाणी, अशोक वाणी, विक्की वाणी,बालकृष्ण थोरात,राजाभाऊ गिरे,दत्तात्रेय मोरे , दादासाहेब गायकवाड,अक्षय आबदार, महेश ढवळे,बाळासाहेब मोरे,शेख समीर, निर्मळ, चव्हाण,उध्दव जाधव ,सुरज ढवळे, कैलास काटे, रोहित भोसले, दिनेश ढवळे सह आदी उपस्थित होते.

Back to top button