महाराष्ट्र

‘नवाब मियाँना ड्रग्जची कावीळ झालीय, मेंदू अन् तब्येत तपासून घ्या’

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एन्सीएबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावल्यानंतर आपला मोर्चा भाजपा नेत्यांकडे वळवला होता. त्यातच त्यांनी भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता भाजप नेतेही संतापले असून मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

फडणवीस यांच्या कुटुंबीयांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं होत. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत थेट इशाराच मलिक यांना दिला होता. त्यानंतर, आता आमदार श्वेता महाले यांनी मलिक यांच्यावर आरोप करताना चोराच्या उलट्या बोंबा, असे म्हटले आहे.

श्वेता यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव.! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,”कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात”, असे ट्विट श्वेता महाले यांनी केले होते. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये बोचरी टीका केली आहे.

Back to top button