प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
पाटोदा दि.२९ डिसेंबर रोजी येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी( न. )संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव आणि के. एस. के. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. सौ. दीपाताई क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर लाभले होते,यावेळी व्यासपीठावर थेरला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.काळे सर, प्रियदर्शनी विद्यालय पाटोदा येथील श्री. ढाकणे सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश माउलगे, उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, पदव्युत्तर विभागाचे संचालक डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, कार्यालयीन अधीक्षक श्री.अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरुवातीला नवगण शिक्षण संस्थेच्या संस्थापिका माजी खासदार स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. देवानंद पुरी यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगून वक्तृत्व स्पर्धेच्या नियम व अटी या विषयी मार्गदर्शन केले . या स्पर्धेमध्ये पाटोदा तालुक्यातील विविध शाळेच्या एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी एकूण पाच विषय ठेवण्यात आले होते, त्यामध्ये १) माझ्या स्वप्नातील भारत२) समाज बदलात युवकांची भूमिका ३) पर्यावरण संरक्षण४) डिजिटल शिक्षण संधी आणि आव्हाने ५) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्य इत्यादी विषयांचा यामध्ये समावेश होता. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११०० रु.द्वितीय पारितोषिक ७००रु. आणि तृतीय पारितोषिक ५००रु. अशी बक्षिसे महाविद्यालयाच्या वतीने ठेवण्यात आली होती, तर स्पर्धेचा कालावधी पाच अधिक दोन बरोबर सात मिनिटे असा ठेवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये विशेष करून मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर नोंदवला गेला. या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट रितीने आपापले विषय मांडण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेमध्ये लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल पाटोदा या शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी गार्गी सुधीर घुमरे हिने “माझ्या स्वप्नातील भारत” या विषयावर उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला. पाटोदा येथील प्रियदर्शिनी माध्यमिक शाळा मुलींची येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.हर्षदा शिवभूषण जाधव हिला द्वितीय क्रमांक मिळाला,तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी रेणुका मिठू नागरगोजे हिला तिसरा क्रमांक मिळाला.
या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य, आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करीत असताना थेरला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून सहभागी स्पर्धकांनाही येथून पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्ये विजेते होण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रियदर्शनी शाळेचे सहशिक्षक श्री. ढाकणे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व स्पर्धकांचे कौतुक करून, “अपयश हेच यशाची पहिली पायरी असते.”असे सांगितले. अध्यक्षीय समारोपमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, प्राचार्या डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आणि साहित्य विश्वातील अनमोल कार्य याविषयीही विवेचन केले. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,” सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कुवतीनुसार विषयाची मांडणी उत्तम रितीने केलेली असून हेच विद्यार्थी पुढे भविष्यात चांगले वक्ते होऊ शकतात, ” असे प्रतिपादन करून सांस्कृतिक विभागाने अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सांस्कृतिक विभागातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या स्पर्धेच्या परीक्षकाची भूमिका अतिशय उत्कृष्ट पार पाडल्याबद्दल प्रा. नामदेव कळसकर सर, प्रा.प्रदीप मांजरे सर यांचेही धन्यवाद मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी डॉ. देवानंद पुरी , प्रा. प्रदीप मांजरे, प्रा. नामदेव कळसकर प्रा. कावेरी खुरणे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमधील सर्व प्रमाणपत्रांचे लेखन व वितरण करण्याचे कार्य प्राध्यापिका मनिषा गाडवे आणि प्राध्यापिका डॉ. अनिता धारासूरकर यांनी पार पाडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. कावेरी खुरणे यांनी तर, उपस्थितांचे आभार प्रा. प्रदीप मांजरे यांनी मानले . या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, पाटोदा तालुक्यातील विविध शाळेमधील विद्यार्थी शिक्षक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



