बीड

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शंभुराजेंच्या पुर्णाकृती पुतळ्यांसह महापुरूषांच्या रखडलेल्या स्मारकासाठी शंभुप्रेमी आक्रमक :- डॉ.गणेश ढवळे

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शंभुराजेंच्या पुर्णाकृती पुतळ्यांसह महापुरूषांच्या रखडलेल्या स्मारकासाठी शंभुप्रेमी आक्रमक :- डॉ.गणेश ढवळे

बीड:- ( दि.०२)बीड जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरूषांचे पुतळे उभारल्याशिवाय स्थलांतर नाही, लोकार्पण सोहळा होऊ देणार नाही या शंभुप्रेमींच्या आक्रोशानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दि.१९ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भुमिपुजन करूनच लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.या घटनेला आता पुढील महिन्यात ४ वर्षें होत आहेत.अद्याप कामाचा पत्ता नसुन केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा , छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचे प्रस्तावित असुन यामध्ये लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या स्मारकाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज दि.०२ सोमवार रोजी शंभुप्रेमी
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड विलास जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग  मोमीन सय्यद शकील अहेमद यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात राहुल वायकर,संजय गोडसे, जयदत्त थोटे,शेख युनुस, शेख मुबीन,सुदाम तांदळे, राजेंद्र आमटे, नितिन सोनावणे, राहुल कवठेकर ,विजय लाटे वरदआदी सहभागी होते.

दिवंगत लोकनेते स्व .अजितदादा पवार यांचाही पुतळा उभारण्याची मागणी

जिल्हा परिषदेच्या आवारात महापुरूषांसह दिवंगत लोकनेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,सुंदरराव सोळंके व लोकनेते गोपीनाथराव मुंडे , दिवंगत लोकनेत्या केशरकाकु क्षीरसागर यांचे पुतळे उभारण्याचे प्रस्तावित असुन नुकतेच विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले बीड जिल्ह्यचे विकास पुरूष लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचाही पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली आहे.

सन २०२३ मध्ये ६० लक्ष तर चालु आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५० लक्ष रूपयांची तरतूद करूनही काम रखडलेल्या अवस्थेत ; निधी अखर्चित :- डॉ.गणेश ढवळे

१६ जानेवारी २०२३ मध्ये जिल्हा परिषद कार्यालय आवारात केलेल्या लक्ष्यवेधी आंदोलनानंतर माहे फेब्रुवारी २०२३ च्या अर्थसंकल्पात ६० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली होती. तर १४ मे २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयात केलेल्या धरणे आंदोलनाऩतर चालु आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद उत्पन्नातुन ५० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे लेखी पत्र मोमीन सय्यद शकील अहमद कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक १ जिल्हा परिषद बीड यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते मात्र काम रखडले असल्याने निधी अखर्चित राहिल्याचे दिसून येते ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी बाब असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

मागणी आणि घोषणा करणारे सत्तेत

महापुरुषांसह लोक नेत्यांच्या पुतळ्यांची मागणी करणारे आणि याबाबत घोषणा करणारे नेते आज एकत्र राज्याच्या सत्तेत आहेत.ता.१९ मार्च २०२२ रोजी तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे, मंत्री अब्दुल सत्तार, तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान खासदार बजरंग सोनावणे हे प्रत्यक्ष तर तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आँनलाईन उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आणि महापुरुषांच्या पुतळ्यांचे भुमिपुजनही पार पडले होते. तेव्हा सत्तेत असलेली मंडळी आत्ताही सत्तेत आहेत मात्र महापुरूषांच्या पुतळ्यांबाबत सरकारला अनास्था का? असा सवाल डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला आहे.

Back to top button