बीड

२० ऑगस्टपर्यंत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास नगरपरिषद कार्यालय येथे सोडू – प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

२० ऑगस्टपर्यंत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास नगरपरिषद कार्यालय येथे सोडू – प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

जामखेड – शहरातील मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जामखेड शहराध्यक्ष दिनेश राळेभात यांच्या नेतृत्वाखाली आज जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार,प्रमोद खोटे, अमोल राळेभात,गणेश पवार,रवि परदेशी आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास सर्व मोकाट जनावरे थेट नगरपरिषद कार्यालयात आणून सोडली जातील, असा इशारा देण्यात आला.

तसेच शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी २० ऑगस्ट रोजी आपल्या भागातील मोकाट जनावरे पकडून नगरपरिषदेत सोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. राळेभात यांनी केले.

Back to top button