बीड

जामखेड : सदाफुले वस्ती येथे SN ब्युटी पार्लरचे उद्घाटन

जामखेड : सदाफुले वस्ती येथे SN ब्युटी पार्लरचे उद्घाटन

जामखेड – शहरातील सदाफुले वस्ती येथे महिलांसाठी सौंदर्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी SN ब्युटी पार्लर या नव्या दुकानाचे आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी पार्लरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पार्लरच्या संचालिका सौ. नंदीनी आकाश गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव सुरेखाताई सदाफुले,संगिता गायकवाड, शकुंतला सदाफुले, राणी सदाफुले, श्वेता आढाव, सिंधुवंदना आव्हाड, मंगल अब्दुले, आशाबाई पवार, पुनम चव्हाण, सिंधु गायकवाड, शैला सदाफुले, करुणा जावळे, राणी पारवे, शिल्पा पारवे, माधुरी खंडागळे, उषा घायतडक आदी माहिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमात बोलताना सुरेखाताई सदाफुले म्हणाल्या की, आजच्या काळात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. समाजातील इतर महिलांनी देखील अशा उपक्रमांतून प्रेरणा घ्यावी.”

पार्लरच्या संचालिका नंदीनी गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत सांगितले की, या पार्लरमधून महिलांसाठी आधुनिक सौंदर्यसेवा, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Back to top button