📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीकविमा वाटप करा

वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीकविमा वाटप करा

*संभाजी ब्रिगेडची निवेदनातून मागणी*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीकविमा वाटप करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२४ चा पीकविमा अद्यापही अंदाजे ७५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीकविमा रक्कमेवरून संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूर्वी ही वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तरी पुढील ८ दिवसांत वंचित राहिलेल्या सर्व अंदाजे ७५ टक्के शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीकविमा तात्काळ वाटप करा अन्यथा या प्रश्नी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासन, प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी अतिरिक्त जिल्हाधिकारी, आमदार व पीकविमा प्रतिनिधी यांना देण्यात आलेल्या आहेत. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण ठोंबरे, वंचित बहुजन आघाडीचे मारूती सरवदे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, नारायणराव मुळे, परमेश्वर मिसाळ, ऍड.प्रशांत पवार, अजय मुळे, संतोष मुळे, हेमराज देशमुख, सुदर्शन सरवदे, बाळासाहेब इके, हनुमंत देशमुख, वैजनाथ तोडकर, नागनाथ दिवटे, बळीराम सरवदे, गोविंद उगले, महादेव सरवदे, राघू हरंगुळे, महादेव सरवदे, चंद्रकांत उगले, बाळासाहेब हरंगुळे, बालासाहेब शेळके, व्यंकट चव्हाण आदींसह शेतकरी, संभाजी ब्रिगेड, विविध पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================

Back to top button