बीड

आष्टी तालुक्यात स्मार्ट मीटरला तत्काळ स्थगिती द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार! मनसेचे कैलास दरेकर

आष्टी तालुक्यात स्मार्ट मीटरला तत्काळ स्थगिती द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार! मनसेचे कैलास दरेकर
………………………………
आष्टी:महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टी तालुक्यात महावितरणकडून बसवल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आणि सामान्य जनतेवर लादले जाणारे हे स्मार्ट मीटर तातडीने स्थगित करावेत, अशी मागणी दरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य आर्थिक जनतेची परिस्थिती आधीच बिकट असताना महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे. या मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज बिल अव्वाच्या सव्वा येण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी प्रशासकीय धोरणावर कडक शब्दांत टीका केली आहे सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची लूट थांबवा: कैलास दरेकर यांनी म्हटले आहे की, स्मार्ट मीटरच्या नावाखाली गरिबांची आर्थिक लूट केली जात आहे. ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सामान्य जनतेला विश्वासात न घेता आणि पुरेशी जनजागृती न करता हे मीटर सक्तीने लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.स्मार्ट मीटरला तात्काळ स्थगिती द्या: आष्टी तालुक्यातील एकाही भागात किंवा शेती पंपावर सक्तीने स्मार्ट मीटर बसवू नयेत. या प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी दरेकर यांनी केली आहे.मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे जर प्रशासनाने आणि महावितरणने ही सक्ती थांबवली नाही, तर संपूर्ण आष्टी तालुक्यात मनसे शेतकरी सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘मस्त’ आणि धडक आंदोलन केले जाईल. होणाऱ्या गंभीर परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.या इशाऱ्यामुळे आष्टी तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, मनसेच्या या भूमिकेला स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Back to top button