बीड

न.प. चे मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी – अशोक लोढा

न.प. चे मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी – अशोक लोढा

बीड (प्रतिनिधि) – सूचना न देता अतिक्रमण काढणाऱ्या मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व वयोवृद्ध महिलेला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी च्या बीड शहर मंडळ च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

          दि. २०/०५/२०२६ रोजी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांचे निर्देश नसताना भाजी मंडई परिसरात बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. कारवाई करताना दुजाभाव करण्यात आला. अतिक्रमण असले तरी ग्रामीण भागातून उपजीविकेसाठी भाजीपाला विक्री करन्यासाठी आलेल्या वयोवृद्ध शेतकरी महिलेचा भाजीपाला फेकून देत तिच्या सोबत अशोभनीय आर्वाच्य भाषेत वर्तन केले. अशा मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी करून शेतकरी महिलेची नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी च्या बीड शहर मंडळ च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

  यावेळी जिल्हाधिकारी याना सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स येथे लाखों रुपये खर्चून अनेक वर्षापासून अद्यावत भाजी मंडई बांधकाम होऊन देखील बंद असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आले. ते भाजी विक्रेत्यांनासाठी खुले करण्यात यावे जेने करून भाजी मंडईतील वाहतूक पण सुरळीत होईल. सध्या सुरू असलेल्या मंडईमध्ये दोन-तीन शाळा, अनेक दवाखाने , सिविल हॉस्पिटल कडे जाणारा मोठा रोड असल्या कारणाने नेहमी वाहतूक कोंडी होते. भाजी विक्रेते फळ विक्रेते रोडवरच बसल्यामुळे वाहनधारकांना त्रास होतो. खरेदीसाठी येणारे ग्राहक रोडवरच गाडी उभी करून खरेदी करतात.  या सर्व बाबींचा विचार करूनमोकळ्या आणि प्रशस्त जागेमध्ये भाजी मंडई स्थलांतरित करण्यात यावी अशी ही मागणी भाजपा, बीड शहर मंडळातर्फे करण्यात आली. भाजी विक्रेते व नागरिकांना नाहक त्रास पण सहन करावा लागणार नाही.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शहराध्यक्ष अशोक लोढा, अशोक घोडके, मधुकर धांडे, भालचंद्र कुलकर्णी, प्रीत कुकडेजा, राजेश चरखा, अमोल वडतीले, अॅड.  सुदर्शन बुंदिले, संतोष गवळी, सुशील जाधव, राजू महुवाले, बाळासाहेब घुमरे आदिसह शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button