बीड

शिवाजीराव ढाळेंना टीडीएफचा “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

शिवाजीराव ढाळेंना टीडीएफचा “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

जामखेड प्रतिनिधी – महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे (TDF) सदस्य तसेच माजी अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, सन्माननीय शिवाजीराव ढाळे सर यांना टीडीएफ (TDF) — महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.२६ एप्रिल २०२५ रोजी पालघर येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये नाशिक विभागातून जीवनगौरव पुरस्कार व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी टी. डी. एफ. च्या विचारांशी प्रामाणिक राहून आयुष्यभर कष्ट करणारे ज्येष्ठ नेते व गुणवंत शिक्षक कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली असून यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यातून जामखेड येथील जेष्ठ शिक्षक शिवाजीराव ढाळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या घोषणेनंतर जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफच्या वतीने ढाळे सरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, टीडीएफचे सचिव भरत लहाने, माजी सचिव रमेश अडसूळ, तसेच प्राचार्य बाळासाहेब पारखे उपस्थित होते.

Back to top button