बीड

सुजात आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

सुजात आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

तुषार बोथरा याच्यावर आयटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी

जामखेड प्रतिनिधी : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र व राज्य नेते सुजात आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेड पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील भाजपा कार्यकर्ते तुषार बोथरा याने फेसबुकवर केलेल्या कथित आक्षेपार्ह कमेंटमुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित टिप्पणीमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व वारसाचा अपमान झाला असून शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात आयटी ॲक्टसह इतर कायदेशीर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तुषार बोथराला ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), संभाजी बिग्रेड, मुस्लिम पंच कमिटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवत सदरील घटनेचा निषेध केला.

यावेळी नगसेविका संगिता भालेराव, प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ,मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर काझी,संभाजी बिग्रेडचे अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते मुख्तार सय्यद,राष्ट्रवादी चे प्रशांत राळेभात,वकील बार संघटनेचे अध्यक्ष ॲड.हर्षल डोके,नगरसेवक वसिम सय्यद, अनिल सदाफुले,
सुरेखा सदाफुले, रेश्मा बागवान,गणेश जाधव, रिजवान बागवान,जुबेर शेख,अंकल घायतडक,नितीन जाधव,सतिष जाधव,परशुराम,जाधव,आदिल शेख,दिलीप गायकवाड,सुमित भालेराव,अक्षय समुद्र,मनोज घायतडक,शेखर कांबळे,योगेश बनसोडे,आरीफ बागवान,सुभाष फुलमाळी,विकी गायकवाड,गणेश घायतडक,बाबा ओव्हळ,अनिल सदाफुले,सागर कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Back to top button