संपादकीयसोलापूर

युवा क्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी

मंद्रूप येथे युवा क्रांती सामाजिक संघटना यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी शिबिर आज मंद्रूप येथे आयोजित केले आहे.
एकीकडे फार्मर आयडी साठी ऑनलाईन सर्व्हिस वाले आर्थिक लूट करीत असताना युवा क्रांती सामाजिक संघटनेने मोफत फार्मर आयडी देत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोफत शिबिराचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आव्हान संघटनेचे पदाधिकारी यांनी केले.
शिबिराच्या उद्घाटना वेळेस मंद्रूप चे तलाठी श्री.रावसाहेब कोकरे, मंद्रूपचे कृषी सहाय्यक रमेश फरताडे साहेब, तंटामुक्त अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले,युवा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अनमोल केवटे, जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, ग्रामपंचायत सदस्य दयानंद खाडे, ज्योतिबा बोराळे, संघटनेचे प्रवक्ते संदीप मेंडगुदले, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश कुंभार, लक्ष्मण माने ,सुशील बनसोडे, शिव कुंभार, संजय कुंभार, राम गोसावी,अनिल टेळे,औराद गावचे पत्रकार श्रीकांत हाले साहेब हे सुद्धा उपस्थित होते..

Back to top button