बीड
महावितरणच्या शाखा अभियंता यांच्या गलथान कारभाराला नागरिक त्रस्त; मगरूर अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज-नागरिकांची मागणी

महावितरणच्या शाखा अभियंता यांच्या गलथान कारभाराला नागरिक त्रस्त; मगरूर अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज-नागरिकांची मागणी
केज शहरात दीड महिन्यापासून मेंटेनेस व वसुलीच्या नावाखाली लाईट बंद ठेवल्याने प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प
केज/प्रतिनिधी :-महावितरणच्या शाखा अभियंता यांच्या गलथान कारभाराला नागरिक त्रस्त झाले आहेत तर
केज शहरात दीड महिन्यापासून मेंटेनेस व वसुलीच्या नावाखाली लाईट बंद ठेवल्यामुळे प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे तरी मगरुर अधिकाऱ्यावर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांतून जोरदारपणे केली जात आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मागील एक ते दीड महिन्यापासून केज शहरात सतत मेंटनस व वसुलीच्या नावाखाली केज शहरातील सात ते आठ, नऊ ते बारा तास वीज पुरवठा बंद ठेवून असंख्य ग्राहकांना व नागरिकांना वेटीस धरण्याचे काम हे महावितरण कार्यालयाचे केज शहर शाखेचे शाखा अभियंता करत आहेत असे जनसामान्यातून बोलले जात आहे.
केज शहरात दहा ते बारा तास लाईट बंद राहिल्यामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली जातात तसेच तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, नगरपंचायत, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, पोस्ट कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय यासह अनेक कार्यालयाचे कामकाज हे ऑनलाइन पद्धतीने चालू आहेत सतत महावितरण कार्यालयाकडून लाईट बंद ठेवल्यामुळे प्रशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झालेले आहे.
शासनाच्या विविध योजनेचा व विद्यार्थी नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढण्यासाठी व शासकीय कामासाठी सदर कार्यालयात लाईट नसल्यामुळे अनेक वेळा नाहक चक्रा माराव्या लागत आहेत. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन व एक्स-रे काढण्यासाठी शहरासह तालुक्यातील व आंबेजोगाई सह बाजूच्या जिल्ह्यातील तालुक्यातील रुग्ण हे सदर ठिकाणी येतात परंतु सतत लाईट नसल्यामुळे याचा फटका रुग्णांना व सर्व साधारण नागरिकांना बसत आहे यास जबाबदार कोण? सतत लाईट बंद असल्यामुळे संबंधित कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, आणि नागरिकांनी महावितरण कार्यालयाच्या लाईनमन, कर्मचारी यांच्यासह शाखा अभियंता यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तींना एकेरी व अरेरावीच्या अर्वाच्च भाषेचा वापर करून बोलत आहेत असे जनसामान्यासह विविध कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून ऐकण्यास मिळत आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून शाखा अभियंता म्हणून रुजू झालेल्या अभियंता या शहरांमध्ये एक पथक घेऊन ग्राहकांकडे थकीत असलेल्या वीज बिलाची वसूली करत आहेत परंतु वीज बिलाची वसुली करत असताना ग्राहक हे संबंधितांना थकित वीज बिल देऊन सहकार्य करत आहेत तर वीज बिलाची वसुली करण्यास ग्राहकांचा अथवा नागरिकांचा कसल्याच प्रकारचा विरोध नाही. एखाद्या ग्राहकांचे वीज बिल थकीत आहे अशा ग्राहकांच्या घरांमध्ये डायरेक्ट शाखा अभियंता या घुसतात व ग्राहकांना एकेरी अरेरावीची भाषा करत काही भागात जाती वाचक शब्दांचा व भाषांचा वापर करून दंडमशाहीने करत खंडणी वसूल केल्याप्रमाणे थकीत वीज बिलाचे पैसे मागितले जातात तर एखाद्या घरामध्ये नागरिक हे स्नान करत असतात तर काही ठिकाणी घरामध्ये महिला कपडे बदलत असल्या तरी सदर अभियंता या डायरेक्ट घरामध्ये घुसून उद्धटपणे बोलत आहेत एखाद्या कुटुंबाचा कुटुंबकरता हा कामानिमित्त बाहेर गेलेले असताना शाखा अभियंता या ग्राहकांच्या घरामध्ये डायरेक्ट कशा आधारे प्रवेश करतात त्यांना नागरिकांच्या घरामध्ये न विचारता प्रवेश अथवा डायरेक्ट घरात जाण्याचा अधिकार आहे का? नागरिकांना जातीवाचक शब्द व अपमानास्पद वागणूक देण्याचा अधिकार काय? असे जनसामान्यातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या नागरिकांना मराठी भाषा समजते व मराठी भाषा व्यतिरिक्त दुसरी भाषा समजत नसताना अशा नागरिकांना इंग्लिश भाषेचा वापर करून दमदाटी करत आहेत असे जनसामान्यातून बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील भीम नगर, क्रांतीनगर, महात्मा फुले नगर, रोजा मोहल्ला या भागामध्ये महावितरण कार्यालयाचे शाखा अभियंता व या भागातील महिला नागरिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे झालेली आहेत. सदर भांडणाची व्हिडिओ क्लिप या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी लोखंडी पोल, सिमेंटचे पोल हे बेंड होऊन झुकलेले आहेत तर बऱ्याचशा ठिकाणी झाडांच्या फांद्यांनी विजेच्या तारा गुरफटून तर काही ठिकाणी अगदी नागरिकांच्या व लहान मुलांच्या हाताला येथील अशा तारा खाली लोबकळत आहेत व अनेक ठिकाणी विजेच्या तारा या घराला चिटकलेल्या आहेत. शहरात बहुतेक ठिकाणी दोन पोरीच्या अंतरामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या ताराला अनेक जॉईंट आहेत व अनेक ठिकाणी पोल झुकल्यामुळे रस्त्यावर तारा खाल्ल्या आलेल्या पाहावयास मिळत आहेत. केज शहरात शाखा अभियंता या वसुली करत असताना सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास का? येत नाही अथवा त्यांना ते दिसत नाही का? शहरातील अनेक भागात विजेच्या तारांची व पोलची दुरुस्ती करणे गरजेचे व आवश्यक असताना दुरुस्ती केली जात नाही तरी दुरुस्तीच्या वसुलीच्या नावाखाली लाईट का? बंद केली जाते असा सवाल जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे.
या शाखा अभियंता यांना वरिष्ठांचा अंकुश नाही का? त्यांना काही राजकीय व स्थानिकांचा वर्धहस्त आहे काय? शाखा अभियंता या कोणाच्या सांगण्यावरून नागरिकांना व ग्राहकांना वेटीस धरतात असे अनेक प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत.
महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्याकडून ग्राहकांच्या मीटरचे रिडींग तपासली जात नाही व रिडिंग न घेताच अंदाजेच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रुपयाचे वीज देयक हे ग्राहकांच्या नावे टाकून वसूल केले जाते तसेच ग्राहकांना महिन्याला वीज बिल वाटप करण्यात येत नाही परंतु सध्या ऑनलाईन विज बिल हे काही ग्राहकांच्या मोबाईलवर येत आहेत तर अनेक ग्राहकांना संबंधित कार्यालयाकडून विज बिल देण्यात येत नसल्यामुळे त्यांचे विज बिल हे थकित जात आहे. महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांना अंदाजे बिल देऊन लूटमार केली जाते. जास्त बिल आल्यानंतर एखादा ग्राहक हा शाखा अभियंता यांच्याकडे बिल कमी करण्यासाठी गेले तर त्यांना कार्यालयामध्ये अनेक चकरा माराव्या लागत आहेत व तीन ते चार तास बसून राहावे लागत आहे.ग्राहकांना भेटण्यासाठी शाखा अभियंता यांना वेळ मिळत नाही व शाखा अभियंता या ग्राहकांचा फोन घेत नाहीत अशाही चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत. महावितरण कार्यालयाच्या शाखा अभियंता यांच्या गलथान व मनमानी कारभाराला नागरिक व ग्राहक त्रस्त झाले आहेत आता तरी महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधिताकडे त्वरित लक्ष द्यावे अशी जनसामान्यातून मागणी जोर धरू लागली आहे.



