
नांदेड शहरातील महिला मेळावा उत्साहात
नांदेड : येथील रेड्डी गार्डनमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने विविध उपक्रम घेऊन महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी बीएसएनएल अधिकारी जयश्रीताई डोखळे तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रतिभाताई बोथीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धाही घेण्यात आल्या. स्पर्धेत विजेत्या महिलांना आदिवासी साहित्यिक राजेश धनजकर लिखित ‘आंध आदिवासी जमातीतील कर्तृत्वान महिला’, ‘आंधाच कारटं’ आणि ‘ आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा’ या पुस्तकांचे बक्षीस रूपात वाटप करण्यात आले तर खेळामधील विजेत्या महिलांना वृक्षांचे बक्षीस देण्यात आले. याच मेळाव्यात वस्त्र, सौंदर्य प्रसाधने, मोहफुलाचे लाडू, कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून विक्रीही झाली. सूर्यकांता मिराशे, वंदना नाईक, नंदाताई वाळकीकर, सविता वाळके, अनुसया धनवे, रूपाली साबळे, निलावती डावरे, सुमन खोकले, सुनीता भिसे, आशा तांबारे, छाया भुरके, अन्नपूर्णा डाखोरे, संगीता रिठे, जयश्री आढाव, मंजुषा मुरमुरे, अनुसया ठाकरे, कल्पना वाळके, सीताबाई मुरमुरे, मीराताई वानोळे, मीनल धनवे यांनी परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते तथा भोकर तालुका आदिवासी समाजाचे समन्वयक गंगाधर वानोळे यांनी महिलांना प्रोत्साहित केले.
प्रास्ताविक प्रसिद्ध कवयित्री सूर्यकांता मिराशे यांनी केले तर आभार सामाजिक कार्यातील वंदना नाईक यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री आढाव व छाया भुरके यांनी केले. मेळाव्यास नांदेड शहरातील ३५० पेक्षा जास्त आदिवासी महिला उपस्थित होत्या.



