बीड
जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे याची मदारी वसाहतीच्या कामास भेट..

जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे याची मदारी वसाहतीच्या कामास भेट..
31मार्च पूर्वी कामे पूर्ण करण्याचे दिले आश्वासन..
जामखेड प्रतिनिधी;-खर्डा येथील गेली सात वर्षा पूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतच्या माध्यमातून मंजूर झालेला व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्नसंदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन 31 मार्चपूर्वी मुस्लिम मदारी समाजाचे घरकुल व अंतर्गत रस्ते, लाईट,वीज, पाणी यासाठी दिलेला निधीचे काम पूर्ण करण्याचे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम करण्याचे आदेश दिले होते.
या संदर्भात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांनी खर्डा येथे येऊन मदारी वसाहतीच्या कामास भेट देऊन घरकुले पूर्ण करून व यासंदर्भात प्रस्ताव पाठवून अंतर्गत रस्ते, विज,पाणी इत्यादीसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. याबाबत त्यांनी सदर काम करणारे ठेकेदार भिमराव सुरवसे यांच्याबरोबर चर्चा करून पहिल्या टप्प्यात मदारी समाजाचे मंजूर असलेले घरकुले पूर्ण करण्याचे आदेश दिले.
गेली अनेक वर्षापासून झोपडीत व पालात राहणारा हा समाज अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असताना त्यांचा पारंपारिक असलेला व्यवसाय सापाचे खेळ दाखवणे व जादूचे प्रयोग करून मनोरंजनातून आपली उपजीविका भागवने होते, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे त्यांचा सापांचा खेळ बंद पडला आहे. त्यामुळे हा समाज कोणतेही हाताला येईल ते काम व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांनी या मदारी वसाहतीच्या घरकुलास भेटी दिल्या परंतु अद्याप पर्यंत काम पूर्णत्वाकडे गेले नाही. 31 मार्च पूर्वी घरकुले पूर्ण करण्याचे आदेश आल्याने मदारी समाजाच्या घरकुलात राहण्याचा प्रश्न निकाली लागेल का याकडे खर्डेकरांचे लक्ष लागले आहे.
या प्रसंगी गटविकास अधिकारी शुभम जाधव, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता चौधरी, शाखा अभियंता लिमजे, डेप्युटी इंजिनियर पंचायत समिती बागुल, सहाय्यक अभियंता बिरकले, खर्ड्याच्या सरपंच सौ. संजीवनी पाटील, बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, तत्कालीन ग्राम विकस अधिकारी प्रशांत सातपुते इत्यादी सह मदारी समाजाचे लोक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



