बीड

जामखेड येथे दंगा काबू पथकाचे संचलन कायद्याच्या रक्षणासाठी जामखेड पोलीस सज्ज – महेश पाटील

जामखेड येथे दंगा काबू पथकाचे संचलन

कायद्याच्या रक्षणासाठी जामखेड पोलीस सज्ज – महेश पाटील

जामखेड प्रतिनिधी –कोणत्याही संभाव्य अनुचित घटनेस तातडीने प्रतिसाद देण्यासाठी व
कायद्याच्या रक्षणासाठी जामखेड पोलीस दल सज्ज आहे. आपत्कालीन परिस्थितीत दंगा काबू पथक, फायर ब्रिगेड व ॲम्ब्युलन्स सेवा तातडीने कार्यान्वित केली जाणार आहे.असे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
आगामी रामनवमी, रमजान ईद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी जामखेड पोलीस स्टेशन यांच्या वतीने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.
जामखेड पोलिस स्टेशन यांच्या वतीने दंगा काबू योजनेचे संचलन करण्यात आले. या संचलनाद्वारे पोलिसांनी आपली तत्परता सिद्ध करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला.

*प्रात्यक्षिकाद्वारे तत्परतेचा आढावा*
सदर प्रात्यक्षिकावेळी 3 पोलीस अधिकारी, 5 पोलीस अंमलदार आणि जामखेड पोलीस ठाण्याचे 15 कर्मचारी तातडीने कार्यरत झाले. तसेच, नायब तहसीलदार संजय काळे यांच्या उपस्थितीत फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स सेवाही 30 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. या अनुषंगाने पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचेही स्पष्ट झाले.

*रूट मार्चद्वारे दिला शांततेचा संदेश*
दंगा काबू योजना यशस्वी पार पडल्यानंतर शहरात रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी पोलिसांच्या तयारीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पोलिसांवर विश्वास असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचा संदेश या संचलनातून देण्यात आला.

Back to top button