स्वराज प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नवरात्रोत्सवात धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात

स्वराज प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नवरात्रोत्सवात धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात
जामखेड : शहरातील तपनेश्वर येथील स्वराज प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती व भाजपाचे तालुका चिटणीस युवा नेते प्रवीण होळकर यांच्या पुढाकाराने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भाजप ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात व सौ. सुनिताताई राळेभात यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी प्रविण चोरडिया, भाजप शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, उद्धव हुलगुंडे, सुनील यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपा शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय राऊत, नितीन शास्त्रकार, आकाश बागडे, शैलेंद्र मोरे, राजेंद्र परदेशी, संदीप कुमटकर, भरत औटे, शांतीनाथ वाघ, गोकुळ भस्मे, धिरज जाधव, अमोल लोहार, अनिरुद्ध रसाळ, गोकुळ गुळवे, विश्वा शिरोळे, गणेश पवार, कान्हा श्रीरामे, करण कळसकर, अवधूत वासकर, सौरभ नागरगोजे, हर्षल शास्त्रकार, धनंजय जाधव, संतोष राऊत, विनोद पोले, अक्षय शेळके, अतिश कोळपकर, उत्तम परदेशी, गणेश वासकर, अतुल लोहार, सागर बाबर, राहुल जायगुडे, आयुष लोहार, दत्तात्रय जाधव, संतोष होळकर, धनंजय बोबडे, भरत राऊत, अनिल लोहार, अमोल बोरकर, संजय डांगरे, संतोष शेळके, नाना कोळपकर, वैभव आष्टेकर, स्वप्निल राजूरकर, शिवाजी मुळे, सुभाष थोरात, गणेश भस्मे, गणेश हगवणे, दादा हापटे, महेश परदेशी, नितीन शिंदे, बंडू नेटके, दादासाहेब वीर, दीपक कळसकर, संदीप परदेशी, राजेंद्र लोहार, विशाल पवार आदी मान्यवर, कार्यकर्ते व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध मनोरंजनात्मक खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लहान मुले, मुली, महिला व पुरुष अशा सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्साहाने या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला. विजेत्यांना स्वराज प्रतिष्ठानतर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये संगीत खुर्ची (चिमुकले विद्यार्थी गट) : कु. वैभवी भरत औटे,संगीत खुर्ची (लहान मुलांचा गट) : चि. संस्कार दत्तात्रय जाधव,संगीत खुर्ची (लहान मुलींचा गट) : कु. अक्षरा आनंद आष्टेकर,संगीत खुर्ची (ज्येष्ठ महिला – सासू गट) : सौ. संगिता नवनाथ कुमटकर,पायाने फुगा फोडणे (तरुण महिला गट) : सौ.सुरेखा गणेश कदम (डांगरे),टोपणाने पाण्याची बाटली भरणे (तरुण महिला गट) : सौ.पल्लवी सागर बाबर,बायकोचा आवाज ओळखणे (महिला व पुरुष गट) : सौ.अश्विनी व श्री. भरत सिताराम औटे,श्री.सुप्रिया व श्री.अमोल दत्तात्रय लोहार आदी.धार्मिक कार्यक्रमांसोबत खेळांच्या आयोजनामुळे उत्सवाला वेगळीच रंगत आली. महिला, तरुणाई व चिमुकल्यांच्या सहभागामुळे उत्सव आनंदमय झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देवा यांनी केले, तर आभारप्रदर्शन आयोजक प्रवीण होळकर यांनी मानले.



