अहमदनगर

प्रा. माने यांच्या माध्यमातून संतोषी माता मंदिर परिसरात सोलार हायमॅक्स ; मंदिर समितीकडून आभार

प्रा. माने यांच्या माध्यमातून संतोषी माता मंदिर परिसरात सोलार हायमॅक्स ; मंदिर समितीकडून आभार

शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने व मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते देवीची आरती

जामखेड प्रतिनिधी – नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील विश्वसम्राट मित्र मंडळ आयोजित संतोषी माता मंदिर येथे आरतीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने व त्यांच्या सौभाग्यवती वर्षा कैलास माने व जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे व त्यांच्या सौभाग्यवती कविता अजय साळवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश वाव्हळ तसेच विश्वसम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष बजरंग डूचे, विजय कुलकर्णी, बापूसाहेब कुलकर्णी, बंडू जोशी (देवा) आदी भाविक- भक्त उपस्थित होते. संतोषी माता मंदिर परिसरात शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने यांनी सोलार हायमॅक्स बसवला असून याबद्दल विश्वसम्राट मित्र मंडळाच्या वतीने व संतोषी माता नवरात्र उत्सव समितीच्या वतीने प्रा.कैलास माने यांचे आभार मानले आहेत.या सोलार हायमॅक्ससाठी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी पाठपुरावा केला असून विशेष सहकार्य आहे. जामखेड शहरात लोड शेडिंगची परिस्थिती असताना या सोलर हायमॅक्सचा नागरिकांना लाभ होत आहे. अंधारातून उजेडाकडे आणण्यासाठी प्राध्यापक माने यांनी शहरात विविध ठिकाणी सोलर हायमॅक्स बसवले आहेत.

Back to top button