अहमदनगर

जामखेड रिक्शा यूनियन व बागवान समाजाची २,००० मतांची शिदोरी घेऊन सलिम बागवान नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात

जामखेड रिक्शा यूनियन व बागवान समाजाची २,००० मतांची शिदोरी घेऊन सलिम बागवान नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात

जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील सर्वसामान्यांचे लाडके सलीम काका रिक्शावाले आता नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार आहेत. रिक्शा यूनियनचे १,००० आणि बागवान समाजाचे १,००० अशी तब्बल २,००० मतांची मजबूत शिदोरी घेऊन ते निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

सलिम बागवान यांनी २०१६ मध्ये संजय गांधी निराधार समितीवर सदस्य झाल्यावर गरीब कुटुंबांना अंत्योदय योजनेत धान्य मिळवून दिले, विधवा-अपंग-निराधार महिलांना पगार मंजूर करून दिला. २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य हज कमेटीवर सदस्य पदी निवड होताच छत्रपती संभाजीनगर येथे हज हाऊस उभारले. अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

१५ वर्षे रिक्षा चालवून शालेय मुलांची सेवा करताना सलिम काकांनी समाजकारणाची गोडी जोपासली. घरप्रपंच सांभाळत त्यांनी सामाजिक कामाची आवड पूर्ण केली. “मोठ्या पदावर गेल्यानंतरही जामखेडकरांसाठी काहीतरी करावे, या इच्छेतूनच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे. सर्व समाजाच्या लोकांवर विश्वासाने मतांची शिदोरी मागत आहे,” असे ते म्हणाले.

२०१७ मध्ये पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीवर अ शासकीय सदस्य पदी निवड झाल्यावर त्यांनी जिल्ह्यात मोठा अल्पसंख्यांक विकास निधी आणला. अल्पसंख्याक समाजासाठी शाळा- कॉलेजच्या मान्यता आणल्या.

सध्या जामखेड मधे बीड रोडवर मोहिनीराज मोटर्स या शोरूमच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना फायनान्स, बँक आणि महामंडळाच्या योजनांतून पँसिजर माल वहातुक गाड्या देऊन रोजगार उपलब्ध करून दिला.

सलिम बागवान हे बागवान समाजातील मुस्लिम OBC असून जनरल महिला, जनरल पुरुष, ओबीसी महिला, ओबीसी पुरुष सर्व मतदारसंघासाठी तयारीत आहेत. “नगराध्यक्ष म्हणून सर्व समाजातील लोकांचा विश्वास संपादन करणे हेच माझे ध्येय आहे,” असे सलिम बागवान यांनी ठामपणे सांगितले.

Back to top button