बीड

गेवराई येथे सुरू असलेल्या गायरान धारकांच्या साखळी उपोषणाला महात्मा फुले समता परिषदेचा पाठिंबा 

गेवराई येथे सुरू असलेल्या गायरान धारकांच्या साखळी उपोषणाला महात्मा फुले समता परिषदेचा पाठिंबा
गेवराई दि.१८ (प्रतिनिधी) :- गेवराई येथील दलित महिला व दलित समाज बांधव हे गेल्या ४० ते ४५ वर्षापासून गायरान शेतजमीन कसत असून त्यांच्या एकीला नोंदी आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांची सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कात नोंद झालेली नाही. हि गायरान शेतजमीन नावावर करावी यासाठी अतिक्रमण धारकांनी गेल्या दहा दिवसांपासून गेवराईत साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त असताना शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भूमीहीन गायरान एकता आंदोलनाच्या वतीने गायरान धारकांचे गेवराईत साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे. साखळी उपोषणाला दहा दिवस झाले असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गायरान शेतजमीन त्यांच्या नावे करावी हि आंदोलन धारकांची प्रमुख मागणी आहे. परंतु झोपेचं सोंग घेतलेले अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा गायरानधारक वयोवृद्ध महिलांनी घेतला आहे. या आंदोलनस्थळी रविवारी महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य – ॲड.सुभाष भाऊ राऊत यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुले समता परिषद संपूर्ण ताकदीनिशी आंदोलकांच्या पाठीशी आहे असा विश्वास ॲड.सुभाष भाऊ राऊत यांनी दिला आहे. याविषयी ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देणार आहेत. शासन व प्रशासन यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलकांना न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली असून रविवारी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला आहे. यावेळी दलित पँथरचे युवा प्रदेशाध्यक्ष धम्मपाल कांडेकर, महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, ॲड.सोमेश्वर कारके यांच्यासह इतर पदाधिकारी, आंदोलन धारक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button