बीड
मराठवाडी येथे शेळी, गाय ,म्हैस ,मेंढी, कुक्कुट पालनचे भव्य पशुपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

मराठवाडी येथे शेळी, गाय ,म्हैस ,मेंढी, कुक्कुट पालनचे
भव्य पशुपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
आष्टी | प्रतिनिधी
यशवंत कृषी ग्राम व पाणलोट क्षेत्र विकास संस्था, हिवरे बाजार आणि येवले ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी मराठवाडी (करंजी घाट) येथील शिवसागर मंगल कार्यालयात भव्य शेळी, गाय, म्हैस, मेंढी व कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“शेती, शेळीपालन आणि समृद्धीची साथ” या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक आयुक्त डॉ. राजळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुधन विकास अधिकारी डॉ. शशिकांत कारखिले असतील.शिबिरामध्ये पशुधन विकास अधिकारी डॉ. महेश पारखे, डॉ. गाडीलकर तसेच यशस्वी शेळीपालक विशाल येवले मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये बंदिस्त, अर्धबंदिस्त व मुक्त शेळीपालन पद्धती, जातींची निवड, चारा व्यवस्थापन, शेड बांधकाम, करडांचे संगोपन, आजार व लसीकरण, आधुनिक बोकड पालन, ईद बाजारपेठेची माहिती तसेच दुग्ध व्यवसायाबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.
याशिवाय शासनाच्या ५०% व ७५% अनुदान योजना, CMEGP व PMEGP योजनांअंतर्गत १५ ते ३५ टक्के सबसिडी, अण्णासाहेब पाटील, ओबीसी व वसंतराव नाईक महामंडळांच्या बिनव्याजी कर्ज योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. बँक कर्जविषयक मार्गदर्शनासाठी पंजाब अँड सिंध बँकेचे अमोल लगे तसेच HDFC बँकेचे श्रीराम बेळगे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरासाठी नोंदणी शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागी शेतकरी व युवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, शासकीय योजना व कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती आयोजक अनंतराव रोखले यांनी दिली.
शिबिरात सहभागींसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकरी, युवक व पशुपालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संदीप हाडे व अनंत रोहोकले यांच्याशी ९८३४४१८५२०, ९४२१८४५७७४, ९०१११८२२२३, ७५८८२०१४१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.तर प्रशिक्षण प्रमाणपत्र हे उद्याच्या येणाऱ्या शासकीय योजनेसाठी आपल्याला आवश्यक असल्याची माहिती आयोजक संदिप हाडे यांनी दिली.


