📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठवाड्यातील युवकांच्या शैक्षणिक समस्यांवर मार्गदर्शन — श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न 

मराठवाड्यातील युवकांच्या शैक्षणिक समस्यांवर मार्गदर्शन — श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न
   बीड प्रतिनिधी:- येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागामार्फत “मराठवाड्यातील युवकांच्या शैक्षणिक समस्या व उपाय” या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती विभाग, बीडचे श्री प्रशांत शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी भूषविले. तसेच उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री प्रशांत शुक्ला यांनी मराठवाड्यातील युवकांसाठी उपलब्ध विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. शिक्षणात निर्माण होणाऱ्या अडचणी, त्या अडचणींचे निराकरण, तसेच उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्याच्या संधी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
मराठवाड्यातील युवकांमध्ये उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांत यश मिळविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शंकर धांडे यांनी समारोपाच्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, उच्च शिक्षण घेतल्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक दर्जा उंचावतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समस्यांना घाबरून न जाता, नैराश्य टाळून, योग्य शिक्षण घेऊन उज्वल करिअर आणि चांगले जीवन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील त्रिभुवन, कार्यक्रमाधिकारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.प्रकाश कोंका यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button