📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

केज पोलीस स्टेशनचा आदर्श उपक्रम.पोलीस बांधवांकडून नांदुर घाट पोलीस चौकी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

केज पोलीस स्टेशनचा आदर्श उपक्रम.पोलीस बांधवांकडून नांदुर घाट पोलीस चौकी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.

नांदूर घाट प्रतिनिधी.:-देशामध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात मुस्लिम समाजाचा हा पवित्र सण मुस्लिम समाजातील बांधव आनंदाने साजरा करत असतात मुस्लिम समाजाच्या उपवासाच्या महिन्यामध्ये इफ्तार पार्टीमार्फत हा महिना मुस्लिम समाजाच्या बांधवांसाठी हिंदू बांधव देतात त्यातच नांदुर घाट येथे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर घाट येथील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन दूरक्षेत्र पोलीस चौकी नांदुर घाट येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन केज पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वैभव पाटील. पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फारूक कादरी. पोलीस कॉन्स्टेबल राजू वाघमारे. बीट अंमलदार राजू वंजारे. पोलीस अंमलदार शमीम पाशा यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीप्रसंगी नांदूर घाट येथील समस्त मुस्लिम समाज व सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आदर्श उपक्रमामुळे खाकी वर्दीतील माणुसकी दिसून आली उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

Back to top button