बीड

अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी स्वर्णसंधी – पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करावे –         ॲड. प्रा. इलियास इनामदार

अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी स्वर्णसंधी – पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करावे –         ॲड. प्रा.
इलियास इनामदार
बीड (प्रतिनिधी): लोकसेना संघटना बीड जिल्ह्यातील युवक युवतींना आवाहन करत आहे की महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुबंई यांच्या मान्यतेनुसार सन २०२५-२६ साठी अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौद्ध, शिख, इसाई, ज्यु, जैन, पारशी व ख्रिश्चन) उमेदवार मुलामुलींचे पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी आझाद हिंद संस्था कामखेडा ता. जि. बीड या संस्थेची निवड केलेली आहे. बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम, बौद्ध, शिख, इसाई, ज्यु, जैन, पारशी व ख्रिश्चन समाजातील मुलामुलींनी ०७ जुलै २०२५ पर्यंत लेखी अर्ज आझाद हिंद सेमी इंग्लिश उर्दू शाळा काझी नगर जालना रोड बीड येथे प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष जमा करावे. उमेदवाराची लगेच दिनांक ९ जुलै २०२५ रोजी शारीरिक चाचणी पोलीस दल अधिकारी, जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी बीड व संस्थेचे प्रमुख हे आझाद हिंद शाळेत घेणार आहेत उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, त्यापेक्षा जास्त शिक्षण असल्यास प्रधान्य राहील, सोघोसित उत्पन्न ८ लाखा पेक्षा कमी असावे, महिला-मुलींसाठी ३० % जागा राखीव राहील, उंची व छाती नियमानुसार असावी, प्रशिक्षण ३ महिने निवासी राहील, प्रशिक्षणा दरम्यान उमेदरांना चहा, नाष्ट, जेवण, शैक्षणिक साहित्य, गणवेश किट, या सुविधा मोफत मिळणार आहेत, तज्ज्ञ शिक्षकांकडून लेखी, तोंडी तयारी व ग्राउंड प्रशिक्षण देण्यात येईल. आझाद हिंद संस्था कामखेडा ता. जि. बीड ही विश्वासु संस्था असुन अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी ही एक  स्वर्णसंधी आहे सर्वांनी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करावे असे आवाहन लोकसेना संघटनेच्या वतीने ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.
Back to top button