📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अ.भा.गुर्जर देवसेनेची कार्यकारिणी जाहीर

अ.भा.गुर्जर देवसेनेची कार्यकारिणी जाहीर
बीड (प्रतिनिधी)-अ.भा.गुर्जर देवसेना संस्थेची जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रीय सचिव ह भ प शहादेव महाराज शास्त्री तसेच लक्ष्मण बहिरवाळ सर, युवराज बहिरवाळ, राजाभाऊ गुजर गुजर युवक संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमान बहिरवाळ यांच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आली यावेळी खालील पदाधिकारी दिलेले आहेत त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
रतन मोहन गुजर (बहीरवाळ).जिल्हाअध्यक्ष, गणेश सिताराम बहीरवाळ जिल्हा कार्याध्यक्ष, सुनिल सर्जेराव गुजर जिल्हा उपाध्यक्ष, अशोक काशीनाथ घोशिर जिल्हा उपाध्यक्ष, राजाभाऊ रंगनाथ गुजर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, अरूण नाथा खटाणे जिल्हा संघटक, केशव सोना आहेर जिल्हा संघटक, गजानन किसनराव बहीरवाळ जिल्हा कोषाध्यक्ष , विनायक नानाभाऊ गुजर(दहे)जिल्हा सचिव, संजय उत्तमराव खटाणे जिल्हा सहसचिव, रेखा सुभाष खटाणे महिला जिल्हाअध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्हा कार्यकारणी अन्य पदाधिकारी व तालूका कार्यकारणी लवकरच पूर्ण होईल असे कळविण्यात आले आहे.
गुजर समाजाचे कार्य तळागाळात नेण्यासाठी जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी आश्वासित केले. यावेळी राष्ट्रीय सचिव ह भ प शहादेव महाराज शास्त्री यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की समाज हिताच्या कार्यात सर्व समाज म्हणून आपण एकत्र येऊ व कोणाच्याही काहीही अडीअडचणी असल्यास सर्व समाज एकत्र येऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करू यावेळी लक्ष्मण बहिरवाळ सर, युवराज बहिरवाळ, राजाभाऊ गुजर गुजर युवक संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमान बहिरवाळ व सर्वांची भाषणे झाली. या सर्वांनी मोलाचे योगदान देण्याचे आश्वासन दिले समाजाला दिशा दाखवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे प्रशांत पाटील व राष्ट्रीय सर्व सदस्य आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी सांगितले आपल्याला घाबरण्याची गरज नाही आपली संघटना देशभर आहे त्यामुळे भक्कमपणे काम करू व समाजकार्य जोमाने पुढे नेऊ असे आश्वासन जिल्हाप्रमुख रतन गुजर यांनी केले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Back to top button