📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जन सुरक्षा विधेयक विरोधात मा कपचे  22 एप्रिल रोजी निदर्शने !  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे — डॉ. संजय तांदळे 

जन सुरक्षा विधेयक विरोधात मा कपचे  22 एप्रिल रोजी निदर्शने !  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे — डॉ. संजय तांदळे
बीड (प्रतिनिधी ) : सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३, ज्याअंतर्गत व्यक्ती व संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्याच्या नावाखाली हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद १९ मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे.हे विधेयक अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनांवर कठोर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करणारे असून, त्याचा गैरवापर राजकीय, सामाजिक आणि विचारसरणीच्या आधारे दडपशाही करण्यासाठी केला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणत्याही लोकशाही देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, त्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लादणे हा लोकशाही मूल्यांचा -हास आणि नागरिकांच्या हक्कांचा अवमान आहे.
या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होईल. म्हणजेच सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध अथवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात आंदोलनाच्या मार्गाने दात मागणे हे देखील बेकायदेशीर ठरल्यामुळे जनतेचा सरकार विरोधी आवाज पूर्णपणे दडपून टाकला जाणार आहे तेव्हा लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी डाव्या आघाडीच्या वतीने मंगळवारी दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष तथा  सेवानिवृत्त ईपीएस 95 समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय तांदळे व मराठवाडा शिक्षक संघटनेचे निमंत्रक प्राचार्य डी जी तांदळे , बीड शहर बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायभाये यांनी केले आहे.
Back to top button