बीड

स्मृतीज्योत रथयात्रेतून जिजाऊंचा पराक्रम व ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचणार – प्रा.मधुकर राळेभात

स्मृतीज्योत रथयात्रेतून जिजाऊंचा पराक्रम व ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहचणार – प्रा.मधुकर राळेभात

जामखेडमध्ये जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे उत्साहात स्वागत

जामखेड, १५ जून — राष्ट्रमाता जिजाऊंच्या ३५१व्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा येथील जन्मस्थळ मातृतिर्थ ते पाचाड येथील समाधीस्थळ (किल्ले रायगड) असा प्रवास करणाऱ्या जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आज सकाळी ११ वाजता जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत करुन राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण तसेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

ढोलीबाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या घोषणांनी जामखेड शहर दुमदुमून गेला.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले की, स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना राजमाता जिजाऊंनी सर्वांना संघटित केले आणि देशाला नवसंजीवनी दिली. स्मृतीज्योत रथयात्रेच्या माध्यमातून त्यांचा पराक्रम आणि ऐक्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

स्वागत समारंभात भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, मराठा सेवक अवधूत पवार, संभाजी ढोले, पोपट राळेभात, दादासाहेब सरनोबत,नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, लेखक एकनाथ चव्हाण, जयसिंग उगले, नय्युमभाई सुभेदार, गणेश काळे, शहाजी वायकर, तात्यासाहेब बांदल, प्रा. जाकीर शेख, आण्णासाहेब ढवळे,वैजिनाथ पाटील, खर्डा येथील सरपंच संजिवनी पाटील, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष संगिता पारे, अॅड. हर्षल डोके, संजय पारे, सुनील जगताप, उद्धव हुलगंडे, ईश्वर मुरूमकर, नवनाथ बहिर, अमोल बहिर, प्रशांत जाधव, सुरज राळेभात यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळी पुण्यतिथीच्या दिवशी सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने जलाभिषेक करण्यात येणार आहे. रथयात्रेचे प्रस्थान १४ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून झाले असून ही यात्रा १७ जूनपर्यंत चालणार आहे.

सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ, जामखेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्मृतिज्योत रथयात्रेचे पूजन व स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर शेकडो बांधवांसह भव्य शोभायात्रा बस स्थानकापर्यंत काढण्यात आली.

Back to top button