संपादकीय

ठाण्यात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार

 

ठाणे | देशात दिवसेंदिवस महिला आणि लहान बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात एका बापाने चक्क पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपीला दोन मुली असून त्यातील एकीचं वय १३ वर्ष आहे तर दुसरीचं वय ६ वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचं बऱ्याचं दिवसांपासून पटत नसल्याने वेगळे राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा येथे तर त्याची पत्नी भगतपाडा येथे राहत होती. त्यामुळे मोठी मुलगी पित्यासोबत राहत होती तर लहान मुलगी आईसोबत भगतपाडा येथे राहत होती.

या दरम्यान आरोपी नराधम पिता गेल्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवतीदेखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली. त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले.

Back to top button