मामाच गाव हरवलं ऑनलाईन गेमनं बालपण हिरावून घेतलं जुने खेळ आले संपुष्टात मुलांना मोबाइलचा लळा अधिक

मामाच गाव हरवलं ऑनलाईन गेमनं बालपण हिरावून घेतलं
जुने खेळ आले संपुष्टात मुलांना मोबाइलचा लळा अधिक
अहिल्यानगर:- पूर्वीच्याकाळी उन्हाळाच्या सुट्ट्यांमध्ये मुले मामाच्या गावी जात असत आता माञ शैक्षणिक बदलामुळे उन्हाळ्याच्या सुटीतही विविध परिक्षा घेतल्या जात आहेत त्यात ऑनलाईन अभ्यासक्रम आणि परीक्षामुळे मुलांच्या हाती मोबाइल आले आहेत मोबाइलमुळे मुलांना व्यसन जडले आहे मुले दिवसभर मोबाइलवर ऑनलाईन गेम खेळण्यात मग्न असतात कॉम्प्युटर व स्मार्टफोनचा लागलेला लळा यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतले मामाचे गाव हरवले आहे
जुने व पारंपरिक खेळही हद्दपार झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण व शहरी भागात आहे स्मार्टफोन येण्यापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनीला मामाच्या गावाची प्रतिक्षा असायची सुट्टी लागताच मैदाने ही गच्च भरलेली असायची या खेळांमध्ये विटी दाडू लपाछपी कबड्डी खोखो भोवरा गोट्या बॅट बॉल मुलींमध्ये दोरी वरच्या उड्या लगोरी सागरगोटे काचकावड्या असे अनेक खेळ खेळले जायचे मुले सुट्टी लागताच मामाच्या गावाला जायचे चिंच कच्च्या कैऱ्या खाणे मनसोक्त फिरणे व विविध खेळ दिवसभर खूळून धम्माल करायची परंतु बदलत्या काळात स्मार्टफोनच्या जमान्यात मामाचे गाव पोरके झाले आहे
चौकानात
स्नेहभाव प्रगट करायलाही वेळच नाही
पारंपरिक खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष झाल्याने गावरान खेळाचे अस्तित्व संपले आहे पूर्वी शाळेला सुट्ट्या लागल्याबरोबर मुले मामाच्या गावाला जात होती आता माञ मोबाइलच्या नादात मुले घराच्या बाहेरही पडत नाहीत विद्यार्थ्यांना नात्यातील स्नेहभाव प्रकट करण्यासदेखील वेळ राहत नाही शहरासह खेडेगावातील कौटुंबिक सामाजिक स्थिती बदलली आहे
चौकानात
अलीकडे ग्रामीण भागातही प्रत्येकाच्या घरी दोन ते तीन तरी स्मार्टफोन आहेत त्यामुळे बच्चे कंपनी आता मोबाइलवर रिल्स पाहण्यात आणि ऑनलाईन गेम यामध्येच गु़तलेले दिसत आहेत परिणामी मुलांमध्ये एकाकीपणा वाढत चालला असून मुले मैदानी खेळापासून दुरावत चालली आहेत शरीराच्या मजबुतीसाठी व आरोग्यासाठी पूर्वी मैदानी खेळ रोज खेळले जायचे आता मैदाने ओस दिसत आहेत सुट्टी लागताच प्रशिक्षण ट्यूशन विविध कोर्स यामध्ये मुलांना गु़तवले जाते मुले मैदानी खेळ खेळत नसल्याने त्याच्यावर परिणाम होत आहे


