बीड

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ वाडी गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; 51 रक्तदात्यांचा सहभाग

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ वाडी गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; 51 रक्तदात्यांचा सहभाग
आज दि. 23 मे रोजी गाव सोमनाथ वाडी ता. जि. बीड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गावातील सर्व युवकांच्या पुढाकारातून मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष व स्वपनील वरपे मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरास ग्रामस्थ व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गरजू रुग्णांना वेळेवर व मोफत रक्त उपलब्ध व्हावे, अपघातग्रस्त तसेच गंभीर रुग्णांचे प्राण वाचावेत या सामाजिक हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 51 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
संपूर्ण शिबिर उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यावेळी आयोजकांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच भविष्यातही युवकांनी अशा सामाजिक कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी गावातील युवक, ग्रामस्थ, वैद्यकीय कर्मचारी तसेच सर्व सहकार्य करणाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. सदर रक्तदान शिबिराचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
Back to top button