इंजि. रोहित उत्तम पवार यांना सुपर सेव्हिअर अवॉर्ड प्रदान

इंजि. रोहित उत्तम पवार यांना सुपर सेव्हिअर अवॉर्ड प्रदान
जामखेड प्रतिनिधी : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव पवार यांचे सुपुत्र तथा इंजि. रोहित उत्तम पवार यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यकौशल्याबद्दल प्रतिष्ठेचा सुपर सेव्हिअर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
मुंबईतील कांदिवली येथील सेन्च्युरी सचिन तेंडूलकर जिमखाना येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार जयदीप केवलरामणी (हेड ऑफ एम्प्लॉईबीलिटी बिझनेस अँड सीओ) यांच्या हस्ते इंजि. रोहित पवार यांना प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर.पी.आय. (आंबेडकर) राज्याध्यक्ष बाळासाहेब पवार, झुंजार नेते तथा वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, ‘सूर्योदय’चे धनराज पवार, पत्रकार संतोष ससाणे, पत्रकार संतोष दाणी, पत्रकार आण्णासाहेब साबळे तसेच समस्त शिक्षक बंधूंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



