बीड
महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे ‘काळी दिवाळी’ व मौन आंदोलन-

महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे ‘काळी दिवाळी’ व मौन आंदोलन-
चरण भाऊ वाघमारे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार भंडारा .
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा :- राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे. पण या संकट काळात सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे फसवे, अपुरे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांनी सांगितले की —
सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे NDRF निकषात आधीपासून असलेल्या मदतीचे पुनरुच्चार असून नवीन काहीही दिलेले नाही.
शेतकऱ्यांसाठी खरी मदत:
६८ लाख हेक्टर नुकसान असूनसुद्धा सरकारने केवळ १३,००० कोटी दिले आहेत, जे अपुरे आहे. हेक्टरी किमान ५०,००० रुपये प्रमाणे ३५,००० कोटी मदत अपेक्षित होती.
घर, दुकान व जनावरांसाठी दिलेली मदतही केवळ NDRF निकषानुसार आहे.
वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला किमान २.५ लाख रुपये थेट आर्थिक मदत मिळायला हवी.
पिकविम्याचा गोंधळ:
विमा कंपन्या देतात ती मदत, सरकारची नाही. चुकीच्या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान दुप्पट झाले आहे.
सरकारने बंद केलेल्या योजना तातडीने सुरू कराव्यात:
‘आनंदाचा शिधा’, ‘माझी सुंदर शाळा’, ‘१ रुपयात पिकविमा’, ‘योजनादूत योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ यांसारख्या जनहिताच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात.
विद्यार्थ्यांना अकॅडेमिक फी माफी द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा. यासाठी महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध म्हणून
————-चौकट ——–
मौन आंदोलनाची घोषणा:
दिनांक : १७ ऑक्टोबर २०२५
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत
जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन त्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे लाक्षणिक मौन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला, जिल्हाध्यक्ष चरण भाऊ वाघमारे,जिल्हा सरचिटणीस विनोद वटी, सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, जिल्हा सहसचिव आधी पदाधिकारी उपस्थित होते .



