बीड

लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ; सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्षपदी शंकर निर्मळ तर उपाध्यक्षपदी अमोल निर्मळ यांची निवड 

लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ; सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्षपदी शंकर निर्मळ तर उपाध्यक्षपदी अमोल निर्मळ यांची निवड
लिंबागणेश:- ( दि.१४)  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.१४ एप्रिल सोमवार रोजी राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष शंकर निर्मळ यांनी केले.आभारप्रदर्शन उपाध्यक्ष अमोल निर्मळ यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्यायावर आधारीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मुलमंत्र देऊन देशातील उपेक्षित समुहातील बांधवांना आपल्या हक्क व अधिकारासाठी आवाज उठवण्याची व लढा उभारण्याची ताकद निर्माण करून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे प्रतिपादन भिम टायगर ग्रुप बीड जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांनी केले. प्रा.लेनाजी गायकवाड यांनी आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  साजरी करण्यात यावी हे कविता सादर केली.यावेळी राजाभाऊ गिरे, श्रीहरी निर्मळ ,बाळकृष्ण थोरात, दामोदर थोरात,रमेश गायकवाड, सुरेश निर्मळ,अँड.गणेश वाणी, रामदास मुळे,दादा गायकवाड, संतोष भोसले आदी सहभागी होते. यावेळी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असुन अध्यक्षपदी शंकर ऊर्फ रिंकु निर्मळ यांची तर उपाध्यक्षपदी अमोल निर्मळ यांची निवड करण्यात आली.सचिवपदी स्वप्निल वक्ते,कोषाध्यक्ष पदी स्वप्निल निर्मळ, सभासद म्हणून सुमेध निर्मळ, स्वप्निल निर्मळ,सौरभ निर्मळ, प्रकाश निर्मळ, तुळशीराम पवार, तुकाराम गायकवाड यांची आरूण निर्मळ,जितु निर्मळ, ज्ञानोबा निर्मळ,पोपट निर्मळ बन्सी निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी भिमजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Back to top button