📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उदरनिर्वाहासाठी लहानग्यांच्या जीवघेण्या कवायती ; डोंबारी खेळांकडे नागरिकांचे दुर्लक्ष ;  बघणारे  डोळे आणि देणारे हातही कमी झाले :- डॉ.गणेश ढवळे 

उदरनिर्वाहासाठी लहानग्यांच्या जीवघेण्या कवायती ; डोंबारी खेळांकडे नागरिकांचे दुर्लक्ष ;  बघणारे  डोळे आणि देणारे हातही कमी झाले :- डॉ.गणेश ढवळे
—
लिंबागणेश:-( दि.२२ ) शिक्षणाचा गंध नसलेल्या डोंबारी समाजाची कथा आणि व्यथा वेगळीच असल्याने या समाजातील लहानग्यांना दोरी वर वेगवेगळी प्रात्यक्षिके करावयास लाऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत असल्याचे दाखवत असताना वास्तव वेगळेच असुन ५ ते १० वर्षाच्या कोवळ्या जिवांना जीवघेण्या कसरती करायला लाऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करत असल्याचे भयान वास्तव ग्रामीण भागात दिसून येते. शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला हा डोंबारी समाज रस्त्याच्या कडेला तसेच बाजारपेठेत पारंपरिक डोंबारी कला सादर करत नाच व खेळ याच संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या उदरनिर्वाह करीत आहेत.
 डोंबारी खेळांकडे नागरीकांचे दुर्लक्ष ; खेळ बघणारे डोळे आणि देणारे हातही झाले कमी
—
पुर्वी डोंबाऱ्याचा खेळ आला की खेळ पहायला गाव जमा व्हायचे. विविध साहसी खेळ दाखवले जायचे.खेळ झाल्यावर जमलेले बघे लोक १०,२०,५० रूपये द्यायचे परंतु आता खेळ बघणारे डोळे आणि देणारे हातही कमी झाले आहेत. कधी २०० तर कधी नशिबाने ५०० रुपये मिळतात. या खेळातुन पुर्वी चांगली बिदागी मिळत होती व यावर कुटुंबाची उपजीविका चांगली चालत होती.परंतु आजकाल खेळ पाहण्यासाठी लोकांकडे वेळ नाही.गावच्या वेशी जवळ अथवा रोडलगत खेळ सुरू केला तर लोक नजर टाकुन पुढे निघून जातात. त्यामुळे सध्या उपजिविकेचा व्यवसाय अडचणीत आल्याची खंत नागपुरचे रामलाल यांनी डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेशकर यांच्याशी लिंबागणेश येथे खेळ सादर केल्यानंतर संवाद साधताना बोलावून दाखवली.
Back to top button